loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुकाध्यक्ष डॉ. निलेश कुंभार यांचा चौदाव्या दिवशी उत्तम उपक्रम :- जिल्हाध्यक्ष सुभाष गुडेकर

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुका कुंभार समाजाच्या वतीने माखजन कुंभारवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा तब्बल १६१ रुग्णांनी लाभ घेतला. शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, एचबी तपासणी, शुगर तपासणी, मोफत औषध वाटप तसेच आयुष्यमान भारत कार्ड याबाबत सेवा व मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाला जिल्हाध्यक्ष सुभाष गुडेकर, लांजा नगरसेवक पंढरीनाथ मायशेटे, युवा प्रतिष्ठान जिल्हाध्यक्ष महेश पडवेकर, जिल्हा संघटक नाना पालकर, जिल्हा परिषद सदस्य सुशील भायजे प्रतिष्ठान मार्गदर्शक जनार्दन मालवणकर प्रतिष्ठान सहसचिव अमित बूरंबाडकर प्रतिष्ठानचे खजिनदार अनिल पडवेकर संगमेश्वर तालुका सचिव मंगेश साळवी, युवा अध्यक्ष प्रथमेश साळवी तसेच युवा प्रतिष्ठानच्या संपूर्ण टीमची विशेष उपस्थिती लाभली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष गुडेकर यांनी तालुकाध्यक्ष डॉ. निलेश कुंभार यांनी तालुकाध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यानंतर चौदाव्या दिवशी उत्तम उपक्रम हाती घेऊन यशस्वीरित्या संपन्न केल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले. आरोग्य शिबिरासाठी लाईफ केअर हॉस्पिटल, चिपळूण, इनफिगो हॉस्पिटल, रत्नागिरी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, माखजन यांचे विशेष योगदान लाभले. तसेच माखजन कुंभारवाडी ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.

टाईम्स स्पेशल

संगमेश्वर तालुका कुंभार समाजाचे अध्यक्ष डॉ. निलेश कुंभार यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना एकाच ठिकाणी विविध आरोग्यसेवा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. समाजाच्या वतीने शिबिराला दिलेल्या योगदानाबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी तुकाराम करंजेकर, सुभाष कुंभार, सतीश कुंभार, सचिन कोलतसकर व प्रणय कुंभार यांच्यासह वाढीतील सर्व ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg