पनवेल : स्थानिक भूमिपुत्र कामगारांना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज डाऊ केमिकल्सविरोधात तळोजा येथे जोरदार मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला पोलिस प्रशासनाने उत्तम सहकार्य केले. मोर्चानंतर डाऊ केमिकल्सचे दोन प्रतिनिधी, तीन कंत्राटदार कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच मनसेचे महानगराध्यक्ष योगेश चिले, जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, महानगर उपाध्यक्ष सूरज गायकर, विभागाध्यक्ष विश्वनाथ पाटील, शाखाध्यक्ष अमोल पाटील आणि कामगार प्रतिनिधी यांच्यात महत्वपूर्ण बैठक पार पडली.
कामगारांच्या प्रश्नावर कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करण्यासाठी कंपनीच्या प्रतिनिधींनी वेळ मागितला. संबंधित वरिष्ठ अधिकारी भारताबाहेर असल्याने त्यांच्याशी चर्चा करून पुढील बैठकीत निर्णय देण्याचे आश्वासन कंपनीने दिले. मात्र, मनसेने कंपनी व्यवस्थापनाला स्पष्ट शब्दांत सांगितले की, आता गोलमोल उत्तर चालणार नाही. पुढील बैठकीत आम्हाला फक्त ‘होय’ किंवा ‘नाही’ यापैकी स्पष्ट उत्तर हवे आहे. यावेळी मनसेने कंपनीला अप्रत्यक्षपणे स्पष्ट इशारा देत सांगितले की, भूमिपुत्रांच्या हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता रस्त्यावर आहे.
सत्तेवर कोणीही असो, कंपनीची वाहने ज्या रस्त्यांवरून धावतात ते रस्ते जनतेचे आहेत, याची कंपनीने जाणीव ठेवावी. कंपनीने सकारात्मक निर्णय घेतल्यास त्याचे स्वागत केले जाईल; मात्र कामगारांवर अन्याय कायम राहिल्यास आंदोलनाची पुढील दिशा अधिक तीव्र केली जाईल, असा स्पष्ट इशारा मनसेने दिला. कंपनीच्या आश्वासनानंतर आजचा मोर्चा स्थगित करण्यात आला असून, पुढील बैठकीत मिळणार्या निर्णयानंतरच आंदोलनाची पुढील भूमिका निश्चित केली जाणार आहे.

















































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.