loader
Breaking News
Breaking News
Foto

गणेशोत्सवाच्या उत्साहाला सामाजिक बांधिलकीची जोड; प्रभाग क्रमांक १५ मध्ये भाजपा ढेकणे दाम्पत्याकडून गणेशोत्सव किटचे वाटप

रत्नागिरी - गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा आपुलकी आणि सेवाभावाचा उत्सव व्हावा, या भावनेतून प्रभाग क्रमांक १५ मध्ये गणेशोत्सवानिमित्त गणेशोत्सव किटचे वाटप करण्यात आले. रत्नागिरी नगर परिषद नगरसेविका तथा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष वर्षा परशुराम ढेकणे आणि भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहराध्यक्ष परशुराम (दादा) ढेकणे यांच्या पुढाकारातून संपूर्ण प्रभागातील नागरिकांना गणेशोत्सव किटचे वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या उत्साहात सहभागी होत त्यांच्या आनंदात आपला आनंद मानण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. प्रभागातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न ढेकणे दाम्पत्याकडून सातत्याने केला जात आहे. त्याच सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून गणेशोत्सवाच्या निमित्ताने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. “गणरायाच्या आगमनाचा आनंद प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचावा आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांशी असलेले आपले नाते अधिक दृढ व्हावे,” या भावनेतून किटचे वाटप करण्यात आल्याचे वर्षा ढेकणे यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

प्रभागातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत ढेकणे दाम्पत्याचे आभार व्यक्त केले. लोकप्रतिनिधी म्हणून केवळ विकासकामेच नव्हे, तर नागरिकांच्या प्रत्येक सण-उत्सवात सहभागी होऊन त्यांच्या आनंदात सहभागी होण्याची ही भूमिका नागरिकांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे प्रभाग क्रमांक १५ मध्ये सामाजिक बांधिलकी, जनसंपर्क आणि आपुलकीचा संदेश पोहोचला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg