loader
Breaking News
Breaking News
Foto

सातार्डा ग्रामपंचायतीचा गुणगौरव सोहळा उत्साहात

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सातार्डा ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील सर्व शाळा आणि हायस्कूलमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी शाळा क्र. १ येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी निलेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. ​या सोहळ्यास पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये, सरपंच संदीप प्रभू, उपसरपंच विशाखा पारिपत्ये, सदस्य वासुदेव राऊळ, मिलिंद जाधव, शर्मिला मांजरेकर, उत्कर्षा पेडणेकर, योगेश गोवेकर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, ग्रामपंचायत अधिकारी कुणाल मसके तसेच बहुसंख्य विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​यावेळी इयत्ता १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक ओंकार मेस्त्री, द्वितीय क्रमांक ओम गडेकर आणि तृतीय क्रमांक समृद्धी सावंत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच एल.एल.बी. परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल फ्रॅक्लिना जॉर्ज फर्नांडिस यांचा मानपत्र व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मुख्याध्यापक दासू गावीत, मंगला आरोलकर, विनया शिरसाट, पदवीधर शिक्षक दीपक जाधव, तसेच ज्येष्ठ अंगणवाडी सेविका शालिनी राऊळ, कर्मचारी अंकुश ठाकूर आणि जयवंती वेंगुर्लेकर यांचा त्यांच्या कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

याशिवाय 'लखपती दिदी'चा बहुमान मिळालेल्या सृष्टी वेंगुर्लेकर यांचाही शाल व श्रीफळ देऊन विशेष गौरव करण्यात आला. ​"ग्रामपंचायतीचा हा स्तुत्य उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे," असे उद्गार गटविकास अधिकारी निलेश जाधव यांनी आपल्या भाषणात काढले. ​कार्यक्रमा दरम्यान १५ व्या वित्त आयोग निधीतून चार मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी कुणाल मसके यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शिर्के यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg