संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा परिसर, चांदोलीचे समृद्ध वनक्षेत्र आणि ऐतिहासिक किल्ले प्रचितगड यांना वनपर्यटनाच्या माध्यमातून जोडण्याची मोठी क्षमता असल्याने हा भाग पर्यावरणपूरक वनपर्यटनासाठी विकसित करावा, यासाठी माजी आमदार डॉ. विनय विजया श्रीधर नातू यांनी वनमंत्री ना. गणेश नाईक यांच्याकडे लेखी मागणी केली आहे. डॉ. नातू यांनी वनमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात ’बत्तीस शिराळा-चांदोली-किल्ले प्रचितगड वनपर्यटन व वनरस्ता चांदोली किल्ले प्रचितगड वनपर्यटन व वनरस्ता विकास प्रकल्प’ वनविभागामार्फत हाती घेण्याची विनंती केली आहे.
डॉ. नातू यांनी पत्रात स्पष्ट केले आहे की, नवीन मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करून रस्ता तयार करण्याऐवजी विद्यमान वनमार्गाचे आवश्यक त्याप्रमाणे सुधारणा व उन्नतीकरण करण्यात यावे. यामुळे वनतोड कमी होईल, पर्यावरणीय परिणाम कमी होतील, प्रकल्पाचा खर्च कमी होईल व स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल. तसेच वनपर्यटन वनरस्ता, आवश्यक ठिकाणी मोर्या, पावसाच्या पाण्याचा प्रवाह कायम ठेवण्याची व्यवस्था, संरक्षण भिंती, दिशादर्शक फलक, प्रचितगड व चांदोली परिसराची माहिती देणारे फलक, सुरक्षित वाहनतळ, पर्यटक सुविधा केंद्र, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, सौरऊर्जेवर आधारित प्रकाश व्यवस्था, प्राथमिक उपचार केंद्र, कचरा व्यवस्थापन, प्रशिक्षित वनपर्यटन मार्गदर्शक आणि वनपर्यटक वाहन व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकल्पासाठी तातडीने बैठक आयोजित करून विषयांकित प्रकल्पाबाबत आदेश व्हावेत, अशी विनंती डॉ. नातू यांनी केली आहे. याबाबत डॉ. विनय नातू यांनी आमदार सत्यजित देशमुख आणि कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक यांचेही लक्ष वेधून घेतले.








































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.