loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीय जनता पार्टी, वैभववाडी तालुक्याच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन - सुधीर नकाशे

वैभववाडी(प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी, वैभववाडी तालुक्याच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. वैभववाडी बाजारपेठेतील इनामदार प्लाझा येथील पटांगणावर हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवात सुप्रसिद्ध कलाकार उपस्थित राहून विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करणार आहेत. या दहीहंडी उत्सव प्रसंगी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दहीहंडी फोडणार्‍या विजेत्या गोविंदा पथकाला रोख एक लाख रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच चार ते पाच थरांची मानवी मनोरे रचणार्‍या गोविंदा पथकांनाही रोख पारितोषिक व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सहभागी सर्व गोविंदा पथकांचा सन्मान करण्यात येणार आहे. सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात येणार्‍या या दहीहंडी उत्सवात तालुक्यातील बाळगोपाळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच सर्व गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन अध्यक्ष सुधीर नकाशे यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg