loader
Breaking News
Breaking News
Foto

रोहन रसाळे याची 14 वर्षाखालील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघामध्ये निवड

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोली या स्कूल मधील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेला श्रीश स्वप्नील सुर्वे आणि इयत्ता 7 वी मध्ये शिकत असलेला रोहन महेश रसाळे या दोन्ही विद्यार्थ्याची नागपूर येथे झालेल्या 14 वर्षा खालील वयोगटातील राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रिकेट संघामध्ये मध्ये निवड झाली आहे. याबद्दल या दोघा विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून हे दोन्ही विद्यार्थी डॉ. योगिता खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रोहन महेश रसाळे यांची 14 वर्षाखालील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झाली असून दिनांक 8 ते 11 सप्टेंबर या तारखेपर्यंत गोवा येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन चंद्रकांत बाईत, सेक्रेटरी स्नेहल सचिन बाईत यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर आबलोली गावचे उद्योजक शुभम सचिन बाईत यांनी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरव करुन पुढील वाटचालीस दिल्या. यावेळी मुख्याध्यापिका नेत्रा नरेंद्र रहाटे व सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg