loader
Breaking News
Breaking News
Foto

कोंडीवरे येथे महिलेला शिवीगाळ संशयितावर गुन्हा दाखल

देवरुख (प्रतिनिधी) - संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे येथील जिल्हा परिषद शाळेत सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेला आर्थिक वादातून जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी मुजीब शौकत माद्रे याच्यावर माखजन पोलीस ठाण्यात अत्याचार प्रतिबंधक कायदा व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला कोंडीवरे येथील जिल्हा परिषद शाळेत सफाई कामगार म्हणून काम करते. तिचा व आरोपी यांच्यात एक हजार रुपये व दोन हजार रुपये या रकमेच्या हिशोबाबाबत आर्थिक वाद होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याच वादातून ४ सप्टेंबर रोजी आरोपीने पीडित महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी पुन्हा वाद झाल्याने आरोपीने शिवीगाळ करीत दगडफेक केली. पीडित महिलेने माखजन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत संशयित आरोपी मुजीब शौकत माद्रे याच्यावर भारतीय न्याय संहित कलम ७४ आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ मधील कलम ३ (१) (आर) (एस) नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच विनयभंगाचा गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटना घडल्यानंतर आरोपी हा घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करून तपासला गती दिली आहे. घटनेच्या वेळी शाळेजवळील परिसरात याबाबत चर्चा असून स्थानिक नागरिकांनी देखील या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. महिलेच्या सुरक्षेसाठी आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg