loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत माणुसकीचे अनोखे दर्शन; श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयात गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर १,००० मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

रत्नागिरी - गोकुळाष्टमी आणि दहीहंडीच्या पवित्र पर्वावर रत्नागिरीवासीयांसाठी एक अत्यंत आनंददायी आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयात गोकुळाष्टमी दहीहंडीचे औचित्य साधत तब्बल १,००० मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या संपन्न झाल्या आहेत. या विशेष टप्प्यामुळे रुग्णालयात आणि परिसरात आनंदाचे व कृतज्ञतेचे वातावरण पसरले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रमुख समाजसेवक निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेने सुरू करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमाचा लाभ रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना मिळत आहे. जिल्ह्यातील उत्तरेकडील मंडणगड तालुक्यापासून ते अगदी दक्षिणेकडील राजापूर तालुक्यापर्यंतच्या सर्वच तालुक्यांतील हजारो गरजू नागरिकांनी या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे.

टाईम्स स्पेशल

विशेष म्हणजे, या रुग्णालयात केवळ मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियाच नव्हे, तर कर्करोगासारख्या (कॅन्सर) महाभयंकर आजारावरही आवश्यक त्या सर्व औषधोपचारांसह अत्यंत यशस्वी आणि पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. जात, धर्म आणि राजकीय पक्षीय भेदाभेदांच्या पलीकडे जात, केवळ ’मानवता’ हेच सर्वस्व मानून हा सेवायज्ञ अविरत सुरू आहे. आज गोकुळाष्टमीच्या दिवशी या उपक्रमाने १,००० मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा टप्पा पूर्ण करत जणू काही ’माणुसकीचा एक वैशिष्ट्यपूर्ण मनोरा’च रचला आहे. अंधकार दूर करून गरजूंच्या आयुष्यात प्रकाशाचा किरण आणणार्‍या या स्तुत्य आणि सर्वसमावेशक उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून निलेश सांबरे आणि रुग्णालय प्रशासनावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg