loader
Breaking News
Breaking News
Foto

गणपतीपुळे बीच पुन्हा बंद; जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेनंतर ग्रामपंचायतीचा निर्णय

रत्नागिरी (जमीर खलफे) : जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या गणपतीपुळे येथील समुद्रकिनारा गुरुवार, ३ सप्टेंबरपासून पुन्हा बंद करण्यात आला आहे. समुद्राची धोकादायक स्थिती अद्याप कायम असल्याने रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रवीण चौधरी यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गणपतीपुळे समुद्रकिनारा मागील दोन महिन्यांपासून समुद्राच्या धोकादायक स्थितीमुळे पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. तब्बल ६० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सुमारे आठवडाभरापूर्वी समुद्रकिनारा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह पर्यटकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, समुद्रातील धोकादायक परिस्थिती अद्याप कायम असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी पुन्हा समुद्रकिनारा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. समुद्राची परिस्थिती सुरक्षित होईपर्यंत पर्यटकांनी समुद्रात उतरणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg