loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत युनायटेडच्या मुलांची बाजी!

मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी आयोजित चिपळूण तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांनी बाजी मारली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१४ वर्षे वयोगटांमध्ये अर्णवी हरिश्चंद्र सावंत, सारंग शैलेश दांडेकर, रुद्र विनोद भोसले यांनी तर१७ वर्षे वयोगटांमध्ये सुरभी वल्लभ चितळे या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय स्पर्धेत यश मिळवून यांची निवड जिल्हा स्पर्धेसाठी झालेले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक समीर कालेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

टाइम्स स्पेशल

यांना शाळेचे मुख्याध्यापक संजय बनसोडे, उपमुख्याध्यापिका कारदगे, पर्यवेक्षक भगवान खाडे व संदीप मुंढेकर, प्रेमजी भाई आसर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यपिका संगीता नाईक तसेच परशुराम एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक यांनी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg