loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड मध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली, दोघांवर गुन्हा दाखल

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील भिलारे-आयनी येथे सकाळी फिरायला गेलेल्या ६९ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गु.र.नं. २८९/२०२६ कलम : भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०४(२), (३), (४) प्रमाणे आणि भा.द.वि.क. ४५७, ३३४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सविता तुकाराम तांबट, (वय ६९ वर्षे, व्यवसाय - गृहिणी, रा. भिलारे आयनी खोंडेवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी ) या दिनांक ०३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ०६.०० वा. चे सुमारास घराबाहेर कपडे धुवत असताना आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळ काढला. निलेश तुकाराम तांबट, (वय ३० वर्षे, व्यवसाय - मजुरी), संदीप शिवराम शिंदे, ( वय ४२ वर्षे, दोन्ही रा. भिलारे आयनी खोंडे वाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात दिनांक गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg