loader
Breaking News
Breaking News
Foto

भोसले सैनिक स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा : दहावीच्या विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव

सावंतवाडी : यशवंतराव भोसले सैनिक स्कूल व यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी भारताचे माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिक्षक दिनाचे औचित्य साधून दहावीतील विद्यार्थ्यांनी पहिली ते दहावीच्या विविध वर्गांमध्ये अध्यापनाची जबाबदारी सांभाळली. शिक्षकांची भूमिका प्रभावीपणे पार पाडत अध्यापनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. अध्यापनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या सर्व विद्यार्थी-शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा ॲड. डॉ. अस्मिता सावंत भोसले, सैनिक स्कूलचे प्राचार्य सॅव्हीओ फर्नांडिस, इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रियंका देसाई, उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक तसेच शिक्षिका उमा झारापकर, प्रीती डोंगरे यांच्यासह शिक्षकवर्ग उपस्थित होता. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा हा शिक्षक दिनाचा उपक्रम उत्साहात पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg