(दापोली: सागर गोवळे) वनोशी तर्फे पंचनदी - आज सकाळी सुपारीच्या पिकावर एकाधिकार गाजवून शेतकर्यांच्या नाकी नऊ आणणार्या घातक ‘कोळेरोगा’वर (फळकूज) आता ‘कृषी सखीं’नी थेट सर्जिकल स्ट्राईक केला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ’ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव’ (ठअथए) उपक्रमांतर्गत वनोशी तर्फे पंचनदी येथील प्रयोगशील शेतकरी श्री. मंदार देपोलकर यांच्या बागेत कृषी सखी गटातील विद्यार्थिनींनी ’१% बोर्डो मिश्रण’ तयार करण्याचे धडाकेबाज प्रात्यक्षिक सादर करून परिसरातील बागायतदारांची मने जिंकली.
पावसाळ्यात सुपारी बागायतदारांसाठी प्रचंड डोकेदुखी ठरणार्या बुरशीजन्य रोगांचा नायनाट करण्यासाठी योग्य प्रमाणात आणि अचूक पद्धतीने बोर्डो मिश्रण कसे बनवावे, याचे थेट (लाइव्ह) प्रात्यक्षिक या विद्यार्थिनींनी शेतावर उतरून करून दाखवले. असे बनवले १% बोर्डो मिश्रण (संजीवनी फॉर्म्युला) - १ किलो मोरचूद, १ किलो चुना, १०० लिटर पाणी आणि प्लास्टिकच्या बादल्या. कृती: ५० लिटर पाण्यात १ किलो मोरचूद आणि दुसर्या ५० लिटर पाण्यात १ किलो चुना स्वतंत्रपणे विरघळवण्यात आला. त्यानंतर चुन्याच्या द्रावणात मोरचूदचे द्रावण हळूहळू ओतून लाकडी काठीने ढवळत एकजीव व अत्यंत प्रभावी जंतूनाशक मिश्रण तयार करण्यात आले. लोखंडी भांड्यांचा वापर पूर्णपणे टाळणे, दोन्ही द्रावणे नेहमी स्वतंत्र तयार करणे आणि फवारणी करताना मास्क व हातमोजे वापरून फक्त ताज्या द्रावणाचाच वापर करणे का गरजेचे आहे, याचे तंत्रज्ञान कृषी सखींनी सोप्या भाषेत पटवून दिले.
या यशस्वी प्रात्यक्षिकाचे आयोजन कृषी सखी गटातील विद्यार्थिनी संजना जंगले, शबरी चव्हाण, मधुजा घडशी, पायल मोरे, रिंकू बाजीया, तरला श्रीदेवी, दिविलीयू, देवीप्रिया पी. टी., श्रीलया एम., मुस्कान कसोटीया आणि नित्या राज यांनी अत्यंत उत्साहात केले. दिग्गजांचे मार्गदर्शन व कौतुकाचा वर्षाव: या उपक्रमाला कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुंकरकर, ठअथए समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रभारी डॉ. विजय देसाई, विषय तज्ञ डॉ. परेश पोटफोडे, तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींच्या या थेट शेतावर जाऊन दिलेल्या प्रात्यक्षिकामुळे स्थानिक सुपारी बागायतदारांना मोठा दिलासा मिळाला असून, वनोशी परिसरातील शेतकर्यांकडून या ‘कृषी सखीं’वर कौतुकाचा भरभरून वर्षाव होत आहे.








































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.