संगमेश्वर (सत्यवान विचारे) - कोकणातील गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यासह विविध शहरांतून मोठ्या संख्येने चाकरमानी गावाकडे येत असतात. गणपती सणाच्या काळात रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याने रेल्वे स्थानकावरून देवरुखकडे जाणार्या एसटी बसची संख्या वाढवावी, तसेच आरवली-माखजन मार्गावरही विशेष बससेवा सुरू करावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा शेतकरी कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव जाधव यांनी केली आहे.
गणपती उत्सवाच्या काळात संगमेश्वर रेल्वे स्थानकावर उतरणार्या प्रवाशांपैकी देवरुखकडे जाणार्या प्रवाशांची संख्या मोठी असते. सध्या रेल्वे स्थानकावरून देवरुखसाठी एकच एसटी बस उपलब्ध असल्याने एका बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी जाण्याची वेळ येते. त्यामुळे गणेशोत्सव काळात या मार्गावर एका ऐवजी दोन एसटी बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जाधव यांनी केली आहे. तसेच आरवली-माखजन मार्गावरही विशेष एसटी बससेवा सुरू करावी, जेणेकरून या परिसरातील गणेशभक्त आणि चाकरमान्यांची गैरसोय दूर होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
गणपती विसर्जनानंतर मुंबई, पुणे आदी ठिकाणी परतणार्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. या काळात प्रवाशांच्या मागणीनुसार परतीच्या मार्गावरही जादा एसटी गाड्या सोडण्यात याव्यात. खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागू नये आणि प्रवाशांना अवाजवी भाड्याचा आर्थिक भुर्दंड बसू नये, यासाठी एसटी महामंडळाने नियोजन करणे आवश्यक असल्याचे जाधव यांनी सांगितले. गणेशोत्सव काळातील अतिरिक्त वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी महामंडळाने तात्पुरत्या स्वरूपात चालक व वाहकांची नियुक्ती करून जादा गाड्या उपलब्ध कराव्यात, अशीही मागणी अशोकराव जाधव यांनी केली आहे.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.