loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा पोलिसांचा अनोखा उपक्रम, पुष्पगुच्छ देवून दिला सुरक्षित वाहतुकीचा संदेश

केळंबे-लांजा, (सिराज नेवरेकर) - शाळकरी मुलांना दुचाकीवरून नेताना पालकांकडून होणार्‍या धोकादायक वाहतुकीला आळा घालण्यासाठी लांजा पोलिसांनी बुधवारी विशेष जनजागृती मोहीम राबवली. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या उपस्थितीत नाकाबंदी करून विशेष म्हणजे कारवाई न करता पोलीसांनी या चालकांना पुष्पगुच्छ देऊन सुरक्षित वाहन चालविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या अनोखी उपक्रमामुळे नियमांचे पालन करण्याबरोबरच वहातूक सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काही पालक दुचाकीवरून मुलांना धोकादायक पद्धतीने नेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे तसेच मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले. धोकादायक पद्धतीने दुचाकी चालविणार्‍या चालकांना समज देऊन यापुढे अशा प्रकारे वाहन चालवणार नसल्याची ग्वाही घेण्यात आली. विशेष म्हणजे, केवळ कारवाई न करता पोलिसांनी या चालकांना पुष्पगुच्छ देऊन सुरक्षित वाहन चालविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. पोलिसांच्या या अनोख्या उपक्रमामुळे नियमांचे पालन करण्याबरोबरच वाहतूक सुरक्षिततेबाबत सकारात्मक संदेश देण्यात आला. दरम्यान, यावेळी लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह कॉन्स्टेबल सुरज नाईकवडे, किरण डोर्लेकर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg