loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगडच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव

देवगड (प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देत त्यांना घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. शिक्षक केवळ ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, आत्मविश्वास आणि चारित्र्याची जडणघडण करतात. अशा या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगडच्या वतीने देवगडमधील सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षिका स्नेहलता देशपांडे, सुशी जोशी बाई, शा.श.कर्णिक, आणि लोंबर यांच्या निवासस्थानी जाऊन रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणारे शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार असून, त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लबने राबविलेल्या या उपक्रमातून गुरुजनांप्रती आदर आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यात आली. या वेळी क्लबच्या प्रेसिडेंट अनुश्री पारकर, सेक्रेटरी दयानंद पाटील, उपाध्यक्ष विजय बांदिवडेकर, खजिनदार अनिल गांधी, नरेश डामरी आणि मनीषा डामरी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg