loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणच्या मूर्तीशाळेत साकारली दशावतार संकल्पनेतील गणरायाची मूर्ती

मालवण (प्रतिनिधी) - मुंबई परेल येथील तकदीर टेरेस मित्रमंडळाच्या मागणीनुसार कोकणातील दशावतार या संकल्पनेवर आधारतीय सुबक व देखणी अशी श्री गणरायाची मूर्ती मालवण मधील गणेश मूर्तिकार हेमंत रामाडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत साकारली असून ही मूर्ती परेल येथे पाठविण्यात आली. दशावतार सारख्या कोकणातील पारंपारिक लोककलेवर आधारित साकारलेली ही गणेश मूर्ती सर्वांचे आकर्षण ठरत आहे. मालवण मधील हेमंत रामाडे हे एक तरुण व एक उत्कृष्ट मूर्तिकार असून गणेशोत्सवासाठी ते दरवर्षी स्वतःच्या संकल्पनेतून तसेच गणेशभक्तांच्या मागणीनुसार विविध आकर्षक व सुबक गणेश मूर्ती साकारातात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावर्षी त्यांना परेल तेथील तकदीर टेरेस या गणेशोत्सव मंडळाकडून कोकणातील दशावतार या लोककलेवर आधारित संकल्पनेतील गणेश मूर्ती साकारण्याची ऑर्डर देण्यात आली होती. आव्हानात्मक अशी वाटणारी ही ऑर्डर हेमंत रामाडे यांनी स्वीकारत गणेश मूर्ती साकारण्यास प्रारंभ केला. अथक मेहनतीमधील दशावतार संकल्पनेतील साडे सहा फूट उंचीची मूर्ती त्यांनी साकारली आहे. ही मूर्ती किशोर कांदळगावकर यांच्या संकल्पने नुसार साकारली आहे. यंदाच्या गणेशोत्सवातील श्री गणेश चित्रशाळेतून मुंबईला रवाना होणारी ही पहिली गणेशमूर्ती आहे. या मंडळासाठी यापूर्वी २०१० मध्ये २१२१ मोदकांची संकल्पना असलेली गणेशमूर्ती तयार करण्यात आली होती. त्यानंतर आयर्लंड येथील गार्डनमध्ये तबला वाद्य वाजविणाऱ्या स्वरूपातील गणेशमूर्तीची ऑर्डरही मंडळाच्या माध्यमातून देण्यात आली होती. तसेच कापसाच्या मोदकांची संकल्पना असलेली गणेशमूर्तीही श्री गणेश चित्रशाळेतून साकारण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

दशावताराच्या रूपात ही मूर्ती साकारण्यासाठी हर्षद तळवडेकर, राकेश वेंगुर्लेकर, योगेश परब, सिद्धार्थ परब, निनाद आडकर, दीप मुंबरकर, वैभव पुरंदरे, साई दांडकर व इतर सहकाऱ्यांचे महत्वापूर्ण सहकार्य लाभले असे मूर्तिकार हेमंत रामाडे यांनी सांगितले. दशावतार संकल्पनेवरील ही गणरायाची मूर्ती परेल येथे पाठविण्यात आली आहे. ही अनोखी गणेश मूर्ती सर्वांचे आकर्षण ठरत असून सर्वांकडून या कलाकारांचे कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg