loader
Breaking News
Breaking News
Foto

पत्नीला भेटण्याचा प्रवास ठरला अखेरचा; नईम चौगुले यांचा दुर्दैवी मृत्यू

संगलट (खेड) (प्रतिनिधी) - पत्नीला भेटण्यासाठी दुचाकीवरून चिपळूणच्या दिशेने जात असताना लोटे येथे महामार्गावर अचानक आडव्या आलेल्या मोकाट गुराला दुचाकीची जोरदार धडक बसल्याने खेड येथील नईम बशीर चौगुले (वय ४१) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवार, ९ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास लोटे येथील जुन्या महामार्ग पोलीस चौकीजवळ हा भीषण अपघात घडला. या अपघातात धडक बसलेले जनावरही जागीच मृत झाले असून दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, नईम चौगुले हे खेडहून चिपळूणच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. लोटे येथील जुन्या महामार्ग पोलीस चौकीजवळ महामार्गावर अचानक मोकाट गुरे आडवी आल्याने त्यांच्या दुचाकीची एका जनावराला जोरदार धडक बसली. या धडकेत चौगुले रस्त्यावर कोसळले. त्यांनी हेल्मेट परिधान केले होते; मात्र अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील नईम चौगुले यांना उपचारासाठी चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे खेड आणि चिपळूण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नईम बशीर चौगुले हे खेड भाजपाचे सक्रिय पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. भाजप नेते वैभव खेडेकर यांचे सहकारी म्हणूनही त्यांची ओळख होती.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg