loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह!

मालवण(प्रतिनिधी)- मालवण शहर व तालुक्यात आज विविध मंदिरे, शाळा कॉलेज तसेच घरांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाचा उत्साह दिसून आला. विविध ठिकाणी श्रीकृष्ण मूर्ती विराजमान होऊन विधीवत पूजन करण्यात आले. तर टाळ मृदूंगाच्या साथीने श्रीकृष्ण नामाचा जयघोष करत तसेच आरती व सुस्वर भजने म्हणून संगीत सेवाही करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शाळा कॉलेजमध्ये मुलींनी पारंपारिक फुगड्या घालत या उत्सवात रंगत आणली. तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमही संपन्न झाले. मालवण शहरांतील टोपिवाला हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज, भंडारी हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज, वायरी येथील रेकोबा हायस्कुल या व इतर शाळांमध्यें गोकुळाष्टमी मोठ्या धूमधडक्यात साजरी करण्यात आली. श्रीकृष्णाच्या गाण्यांनी तसेच नामघोषाने अवघे मालवण नगरी दुमदुमून गेली होती.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg