(दापोली-सागर गोवळे)वणोशी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी महाविद्यालयाच्या ‘रावे’ (ठअथए) उपक्रमात ‘कृषी स्नेही’ गटाने वणोशीत एक जोरदार आणि शेतकरी उपयोगी प्रात्यक्षिक पार पाडले. नारळ बागायतदारांची सर्वात मोठी डोकेदुखी असलेल्या ‘उंदीर समस्येवर’ मात कशी करायची, याचे थेट धडेच यावेळी शेतकर्यांना देण्यात आले. उंदरांमुळे नारळाची अकाली फळगळ होणे, रोपवाटिकेत लहान रोपांचे अतोनात नुकसान होणे यांसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी कृषी कन्यांनी विविध उपाययोजनांची प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांची मने जिंकली.
उंदीर पळवण्यासाठी जमिनीपासून २ ते ३ मीटर उंचीवर नारळाच्या खोडाभोवती ४५ सेंमी रुंदीचा ‘गॅल्वनाइज्ड पत्रा’ कसा बसवायचा, याचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. हा पत्रा लावल्यास उंदीर झाडावर चढूच शकत नाहीत! उंदरांचा पूर्ण सुळसुळाट मोडून काढण्यासाठी ‘झिंक फॉस्फाइड’युक्त विषारी आमिष सुरक्षिततेची योग्य ती काळजी घेऊन कसे वापरावे, याचे तंत्र समजावून सांगितले. वाळलेली पाने, करवंट्या काढून बाग चकाचक ठेवल्यास उंदरांना लपायला जागाच उरणार नाही. शिवाय, नवीन लागवडीत २५ फूट योग्य अंतर ठेवण्याचा सल्लाही दिला गेला. बागेत उंदरांची बिळे, घरटी किंवा कुरतडलेल्या खुणा दिसताच तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले.
या यशस्वी उपक्रमात कृषी स्नेही गटाच्या समृद्धी जाधव, आकांक्षा गाडगे, श्रावणी मोरे, तन्वी नादिवडेकर, नीलम मदने, कोमल झिरवाळ, श्रुती बोबडे, अंकिता मुंज, सलोनी सावंत व साक्षी लोके या कृषी कन्यांनी सहभाग नोंदवून प्रात्यक्षिक तडीस नेले. सदर प्रात्यक्षिकाला सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषयतज्ज्ञ डॉ. समीर काळे आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कृषी कन्यांच्या या उपक्रमाचे वणोशीतील बागायतदारांनी मनापासून कौतुक केले आहे.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.