loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी क्लबचा टीचर ऑफ इयर अवार्ड आकुर्डे गुरुजींना

रत्नागिरी - रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी यांच्या वतीने दिला जाणारा टीचर ऑफ द इयर अवार्ड 2026 चे मानकरी ठरले ते जिल्हा परिषद आदर्श शाळा टिके कांबळेवाडी नं. 3 चे उपशिक्षक शितलकुमार कुमार आकुर्डे. पटवर्धन हायस्कूलच्या सभागृहात पार पडलेल्या या दिमाखदार पुरस्कार सोहळ्यासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष ॲड.मनीष नलावडे, सेक्रेटरी आनंद चौगुले, खजिनदार धीरज वेल्हाळ, विनायक हातखमकर, नरेंद्र चव्हाण, कॅप्टन दिलीप भाटकर, भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष नमिता किर, पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका घाटविलकर, गुळवणी, उदय शिंदे इत्यादी रत्नागिरीचे दिग्गज मान्यवर उपस्थितीत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आजपर्यंत शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची पोहोच पावती म्हणजे शितलकुमार कुमार आकुर्डे यांचा हा टीचर ऑफ द इयर अवार्ड 2026 हा पुरस्कार होय. हा पुरस्कार कुटुंबीय व मित्रपरिवार यांच्या सोबत गुरुजींनी स्वीकारला. या पुरस्काराबद्दल पोमेंडी बीट शिक्षण विस्तार अधिकारी प्रा. सुधाकर मुरकुटे, टिके केंद्रप्रमुख मीनल कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश सांडिम, उपाध्यक्ष रुपेश सांडीम, सरपंच भिकाजी शिनगारे, माझी विद्यार्थी समिती अध्यक्ष राजेश कांबळे, जितेंद्र शिनगारे, महेंद्र सांडीम आदींनी आदींनी गुरुजींचे अभिनंदन केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg