loader
Breaking News
Breaking News
Foto

सामाजिक सांस्कृतिक सहकार चळवळीतील कुंभवे येथील बाबू मांडवकर यांचे दुःखद अकाली निधन

दापोली (प्रतिनिधी) - सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, क्रीडा, कृषी आदी चळवळीत कायमच अग्रणी असलेले कुंभवे येथील बाबू मांडवकर यांचे वयाच्या 56 व्या वर्षी अचानक दुःखद निधन झाले. दापोली तालुक्यातील कुंभवे येथील कायम रहिवाशी असलेले बाबू मांडवकर यांनी जाखडी नृत्य, ढोल, सनई ,टिमकी पारंपारिक खालुबाजा वाजविणे, भजन आदी सांस्कृतिक क्षेत्रातील रुची असलेले बाबू मांडवकर यांनी कुंभवे विविध सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून सहकार क्षेत्रात उत्तम काम करून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला होता. एसआयआर मतदार यादया तयार करण्याच्या कामात बीएलओची भूमिका निभावत होते. त्यांनी कुंभवे ग्राम पंचायतीचे तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले होते, असे विविध गुणसंपन्न व्यक्तीमत्व असलेले बाबू मांडवकर हे मंत्री महोदय नाम. योगेश कदम यांचे कट्टर समर्थक होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माजी सरपंच आणि शाहीर अनंत मांडवकर यांचे ते बंधू होत. सहकार, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, कृषी आदी विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्य कर्तुत्वाचा ठसा उमटविलेल्या बाबू मांडवकर यांच्या अकाली निधनाने कुंभवे परिसरावर शोककला पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहीत मुलगे, सुना, नातवंडे, भाऊ, भावजय, पुतणे असा मोठा परिवार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg