loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, झाडगाव येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, झाडगाव-रत्नागिरी येथे भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात, आनंदी व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक ए. डी. पाटील सर यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय योगदानाचे स्मरण करून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिक्षक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांविषयी मनातील आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली. अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाषणे करून ‘शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नसून विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक, संस्कारक आणि प्रेरणास्रोत आहे’, हा संदेश आपल्या मनोगतातून प्रभावीपणे मांडला विद्यार्थ्यांच्या भावपूर्ण शुभेच्छांमुळे कार्यक्रमाला विशेष भावनिक व आनंददायी वातावरण प्राप्त झाले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करताना, आई-वडिलांनंतर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत मोलाची असते, असे सांगितले. शिक्षक आपल्या ज्ञानातून विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रम शिकवत नाहीत, तर जीवनातील संघर्षांना सामोरे जाण्याचे धैर्य, चांगले संस्कार, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करतात, याची जाणीव विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. यावेळी शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याचा आदर्श घेऊन ज्ञान, विज्ञान, विवेक, संस्कार आणि मानवतेच्या मूल्यांवर आधारित जीवन जगण्याचे आवाहन केले.

टाईम्स स्पेशल

शिक्षण हे केवळ गुण मिळविण्याचे साधन नसून उत्तम व्यक्तिमत्त्व घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन करण्यात आले. शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये असलेले जिव्हाळ्याचे नाते, परस्परांप्रती असलेला आदर आणि शिक्षणाबद्दलची सकारात्मक भावना या कार्यक्रमातून प्रकर्षाने जाणवली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे शिक्षकही भारावून गेले. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक ए. डी. पाटील, ज्येष्ठ शिक्षक सुतार, पाटील, जाधव, मंडले, शितूत, सावंत, सनगरे, फगरे मामा, सावंत, पवार मामा तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप, संस्कारांचा आधार आणि भविष्याचा शिल्पकार. शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता हीच या कार्यक्रमाची खरी फलश्रुती ठरली. उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात शिक्षक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg