loader
Breaking News
Breaking News
Foto

पिठापासून दागिने आणि खेळ पैठणीचा; रत्नागिरीत प्रभाग 5 मध्ये महिलांसाठी रंगली श्रावणी स्पर्धा

रत्नागिरी : श्रावण महिन्याचे औचित्य साधून साळवी स्टॉप येथील स्व. बाळासाहेब ठाकरे ऍक्टिव्हिटी सेंटरमध्ये प्रभाग क्रमांक ५ च्या नगरसेविका पूजा दीपक पवार यांच्या विशेष माध्यमातून महिलांसाठी विविध आगळ्यावेगळ्या स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. १ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सोहळ्यात श्रावण महिन्याचे वैशिष्ट्य जपणारी ‘पिठापासून दागिने बनवणे’ ही कल्पक आणि पारंपरिक स्पर्धा विशेष लक्षवेधी ठरली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यासोबतच मंगळागौरीचे पारंपरिक खेळ आणि महिलांच्या गळ्यातील ताईत असलेला ‘खेळ पैठणीचा’ रंगला. संपूर्ण स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर प्रभाग क्र. ५ मधील तनुजा बहुतुले यांनी मानाची पैठणी जिंकत 'पैठणी विजेती' होण्याचा बहुमान मिळवला. स्पर्धेत महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अनेक वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली: उत्कृष्ट उखाणा, उत्कृष्ट पिंगा/पखवा, उत्कृष्ट झिम्मा-फुगडी, पारंपरिक वेशभूषा, ऑलराऊन्डर परफॉर्मन्स.. या संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रथमेश साळवी ह्यांनी तर परीक्षण (Judge) अनुप्रिता कोकजे आणि श्रद्धाताई कुलकर्णी यांनी अत्यंत तटस्थपणे आणि कौशल्याने केले. तसेच मंगळागौर खेळाचे सूत्रसंचालन प्रथमेश साळवी यांनी करून खूप रंगत आणली.

टाईम्स स्पेशल

जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत आणि आमदार किरण भैय्या सामंत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे ह्यांच्या सहकार्याने नगरसेविका पूजा दीपक पवार या दरवेळी अशा नवनवीन संकल्पना राबवून प्रभागातील महिलांसाठी एक हक्काचे आणि आनंदी व्यासपीठ उपलब्ध करून देतात. त्यांच्या या उपक्रमामुळे प्रभागातील महिला तसेच नागरिकांमधून पूजा पवार यांच्या संकल्पनेचे आणि आयोजनाचे जोरदार कौतुक होत असून सर्वत्र समाधानाचे वातावरण व्यक्त केले जात आहे. या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिलेल्या सर्व स्पर्धकांचे व स्पर्धा यशस्वी करणाऱ्या सर्वांचे नगरसेविका पूजा दीपक पवार आणि दीपक पवार ह्यांनी आभार व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg