loader
Breaking News
Breaking News
Foto

देखण्या साहित्य व मकरांनी बाजारपेठ फुलली; बाप्पाच्या आगमनाची सर्वत्र लगबग

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - विघ्नहर्त्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दीवस उरले असून बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. शहरातील बाजारपेठेत विविध प्रकारचे मकर (आरास), पारंपारिक आणि आधुनिक सजावटीचे साहित्य, विद्युत रोषणाईंच्या वस्तूने बाजारपेठ फुलून गेली आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी नागरीकांनी खरेदीला सुरवात केली असून गणपतीच्या आगमनाची प्रतिक्षा गणेशभक्तांना लागून राहीली आहे. मुर्तीशाळांमध्ये गणपतीच्या मुर्तीवर अंतिम रंगकामाचा हात फिरविण्याचे काम रात्रंदिवस सुरू आहे. तसेच घरांची स्वच्छता आणि सजावटीच्या तयारी सुरू झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळामध्येही तयारीची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. घरगुती गणपतीसोबतच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही आपापल्या देखाव्यांसाठी साहित्याची खरेदी सुरू केली आहे. बाप्पाच्या आगमनाची ही चाहूल संपूर्ण शहरात चैतन्य निर्माण करते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg