loader
Breaking News
Breaking News
Foto

पेणमधून १६ लाखांहून गणेशमूर्ती विदेशात १०० कोटींपेक्षा अधिक उलाढाल

पेण, (वार्ताहर): पेण तालुक्यातील पंधराशेच्या आसपास असलेल्या छोट्या-मोठ्या कारखान्यांतून सुमारे १६ ते १७ लाखांच्या आसपास शाडू मातीच्या गणेशमूर्ती व प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीची निर्मिती होत असल्याने सुमारे सहा ते सात हजार बेरोजगारांना वर्षभराचा रोजगार उपलब्ध झाला आहे. म्हणून हा हस्तव्यवसाय पेण तालुक्यातील करागिराना एक वरदान ठरला आहे. आतापर्यंत सुमारे १६ लाखहून अधिक गणेशमूर्ती देशविदेशात रवाना झाल्या असून यातून १०० कोटींची उलाढाल झाली आहे. एकट्या पेण शहरात गणेशमूर्तीच्या निर्मितीचे ५५० ते ६५० च्या घरात रजिस्टर्ड कारखाने आहेत. त्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर कारखाने ग्रामीण भागात व शहराच्या विभागात पाहायला मिळतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र, यापैकी बारमाही चालणारेही ग्रामीण व शहरी भागात शेकडो कारखाने आहेत. यात प्रभात कलामंदिर, गणेश कलामंदिर, दीपक कला केंद्र, कल्पना कलामंदिर, सागर आर्ट, अनिल आर्ट, त्रिमुर्ती केंद्र, अष्टविनायक कला केंद्र, सुहास आर्ट, दामोदर कला केंद्र, हमरापूर येथील दाभाडे बंधू, ऐश्वर्या आर्ट, कुणाल आर्ट, मळेघर-किशोर कला केंद्र, शिर्की, जोहे, गडब, तांबडशेत, कळवा, कांदळेपाडा, वडखळ, दादर, कोप्रोली, धोडपाडा उंबर्डे आदी अनेक गावांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील कारखान्यांपैकी पेणच्या कल्पना कला मंदिर व प्रभात कलामंदिर अशा मोजक्या कारखान्यातील कामगारांना फॅक्टरी अ‍ॅक्टप्रमाणे रोजंदारी व अन्य सुविधा दिल्या जात आहेत. इतर बहुतांशी कारखानदार रोजंदारीने कामे करून घेत आहेत. त्यात त्यांना ३०० ते ४०० रूपये तर जुन्या कामगारांना ६०० ते ७०० रूपये रोज दिला जातो. आखणी कामासाठीचा दर एका छोट्या मूर्तीसाठी ४० रूपयांपासून ८० रूपयांपर्यंत असतो.

टाईम्स स्पेशल

अखेरच्या जुलै, ऑगस्ट महिन्यात रात्रपाळीसाठी प्रत्येक तासाला वाढीव ४० ते ५० रूपये इतका दर दिला जात आहे. या हस्त व्यवसायात निव्वळ ६ ते ७ हजार कामगारांना रोजगार मिळतो आहे. या कलाकुसरीत तालुक्यात शंभर कोटीहून अधिकची आर्थिक उलाढाल होत असते. असे असले तरी कारागीरांना भासणारा तुटवडा, गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणार्‍या शाडू मातीच्या किंमतीत सतत होणारी वाढ, रंगांच्या किमतीत झालेली वाढ, सरस, गोंद अभ्रक, कुंचले, सफेदी वॉर्निश आदी साहित्यांचा वाढत्या किमती यामुळे मुर्तीच्या किंमती यावर्षीही २० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg