loader
Breaking News
Breaking News
Foto

बहिरवली ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच नूर मोहम्मद हमजा चौगुले यांची सलग ४ वेळा बिनविरोध निवड

खेड - खेड तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत बहिरवली ग्रामसभा बुधवार, दि. ०२ सप्टेंबर २०२६ रोजी खेळीमेळीच्या आणि उत्साही वातावरणात पार पडली. ग्रामसभेदरम्यान बहिरवली गावातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याच बैठकीत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती, ४ वेळा अध्यक्षपदी माजी सरपंच नूर मोहम्मद हमजा चौगुले यांची बिनविरोध यांची निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माजी सरपंच नूर मोहम्मद हमजा चौगुले यांच्या अध्यक्षपदी नियुक्तीबद्दल बहिरवली ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बहिरवली गावात शांतता, सलोखा आणि बंधुभाव अधिक दृढ होऊन गावाच्या विकासाला चालना मिळावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

ग्रामसभेत सर्वानुमते झालेल्या या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील शांतता, सामाजिक सलोखा, एकोपा आणि बंधुभाव कायम राखण्यासाठी तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जाते. गावातील विविध समस्या व तंटे सामोपचाराने सोडविण्यासाठी तसेच ग्रामस्थांमध्ये परस्पर सहकार्य आणि समन्वय वाढविण्यासाठी समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg