loader
Breaking News
Breaking News
Foto

दोन दिवसांत गणेशोत्सवासाठी लांजा उड्डाणपूल वाहतुकीस खुला होणार

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा शहरातील उड्डाणपुल येत्या दोन दिवसात गणेशोत्सवापुर्वीच वाहतुकीस खुला करण्यात येणार असल्याची माहिती महामार्गाचे अधिकारी कुलकर्णी यांनी दिली आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात येणा-या चाकरमानी मंडळीचा प्रवास वेगाने आणि सुखकर होणार आहे. या पुलामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिनांक २० ऑगस्ट रोजी लांजा उड्डाणपुलावरून प्रायोगिक तत्वावर मुंबई ते गोवा अशी एकेरी वहातुक सुरू करण्यात आली. पुलाला जोडण्यात आलेल्या रस्त्याचे काम पुर्ण होत आल्याने येत्या दोन दिवसात सदर पुल वाहतुकीस पुर्णपणे खुला होणार आहे. त्यामुळे बरेच दिवसाची प्रतिक्षा संपणार आहे. लांजा तालुक्यातील, परिसरातील नागरिकांसाठी तसेच वाहन चालकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे लांजा उड्डाणपूल वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे.

टाईम्स स्पेशल

यामुळे वहातूक कोंडीचा मोठा प्रश्न सुटणार आहे. लांजा गावातून जाणार्‍या मार्गावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागत होत्या. शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका, शेतकरी, व्यापारी तसेच दैनंदिन प्रवास करणार्‍या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. पण आता या उड्डाणपुलामुळे वाहनधारकांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुरळीत होणार आहे. वहातूक अधिक गतिमान होणार आहे. गणेशोत्सवापुर्वी येत्या दोनच दिवसात पुल वाहतुकीस खुला होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg