loader
Breaking News
Breaking News
Foto

मुरूड-डोंगरी-मुंबई एसटी सेवा २० दिवसांपासून बंद; प्रवाशांचा संताप

संगलट ( खेड ) (इक्बाल जमादार) - रायगड जिल्ह्यातील मुरूड-डोंगरी ते मुंबई सेंट्रल ही एसटी बससेवा गेल्या २० दिवसांपासून बंद असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. बससेवा बंद करण्यामागचे नेमके कारण काय, याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट माहिती मिळत नसल्याने प्रवाशांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुरूड आगारप्रमुख चिन्मय यांच्या म्हणण्यानुसार, चार दिवसांपूर्वी मुरूड येथे काही प्रवाशांनी आंदोलन केले होते. यावेळी सकाळची मुरूड-मुंबई बस डोंगरीमार्गे न पाठवता दादरमार्गे मुंबईला सोडावी, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीनंतर डोंगरी मार्गावरील बससेवा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या निर्णयामुळे डोंगरी तसेच मार्गावरील गावांमधील सर्वसामान्य एसटी प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रवाशांची संख्या वाढविणे, वेळापत्रकात आवश्यक बदल करणे आणि सेवा अधिक सोयीची करणे यासाठी प्रयत्न करण्याऐवजी बससेवा बंद करण्याचा मार्ग का स्वीकारला जात आहे, अशी नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली. बससेवा तातडीने सुरू करून डोंगरी परिसरातील प्रवाशांना दिलासा द्यावा आणि बस बंद करण्यामागील कारण प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg