loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर येथील रामपेठ अंगणवाडीत 'दहीहंडी' उत्सव उत्साहात साजरा! बाळगोपाळांचा जयघोष आणि अलोट उत्साह

संगमेश्वर दि ५ सप्टेंबर एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प देवरुख बालविकास प्रकल्प अधिकारी प्रथमेश इंगवले व बीट पर्यवेक्षिका रेश्मा सासणे यांच्या मार्गदर्शनाखाली बुरंबी बीट अंतर्गत, नावडी ग्रामपंचायत हद्दीतील रामपेठ अंगणवाडीत श्रीकृष्ण जयंती व गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने 'दहीहंडी' उपक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात लहानग्या बाळगोपाळांचा उत्साह ओसंडून वहात होता. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून नावडीचे प्रशासक प्रज्ञा कोळवनकर , विवेक शेरे, तसेच सामाजिक कार्यकर्ते विनय मुरकर आणि आलोक जाधव आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अंगणवाडी सेविका पल्लवी शेरे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले आणि उपस्थितांना गोकुळ अष्टमी सणाचे महत्त्व समजावून सांगितले.राधा- कृष्णाच्या वेशभूषेने वाढवली शोभा उत्सवासाठी अंगणवाडीतील लहान मुले आणि मुली राधा, कृष्ण आणि गोप-गोपिकांच्या आकर्षक व राजेशाही वेशभूषेत नटून उपस्थित होती. मुलांनी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडली. यावेळी "राधाकृष्ण- गोपाळकृष्ण" आणि "गोविंदा रे गोपाळा" अशा जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. बाळगोपाळांना मान्यवरांच्या हस्ते फळे आणि खाऊचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला मुलांच्या पालकांची देखील मोठी उपस्थिती लाभली होती. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन अंगणवाडी सेविका पल्लवी शेरे आणि मदतनीस शीतल आंब्रे यांनी केले होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg