loader
Breaking News
Breaking News
Foto

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खेड पोलीस प्रशासनाला निवेदन; वाहतूक व गर्दी नियोजनाची मागणी

खेड - कोकणातील गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सव काळात मुंबई, पुणे येथून लाखो चाकरमानी खेड तालुक्यात दाखल होतात. त्यामुळे खेड शहर, बाजारपेठ, मुख्य चौक, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड परिसर आणि प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात गर्दी आणि वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि बाहेरून येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये आणि उत्सव सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन खेड यांना निवेदन देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवेदनातील प्रमुख मागण्या : मुख्य बाजारपेठ व गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करावा. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जड वाहनांना पर्यायी मार्ग व नो-एंट्रीचे नियोजन करावे. भाविकांच्या वाहनांसाठी शहराबाहेर तात्पुरती पार्किंग व्यवस्था करावी. चोरी, पाकीटमारी, महिलांची छेडछाड रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस तैनात करावेत. रात्रीची पोलीस गस्त वाढवावी. स्थानिक गणेश मंडळे व व्यापारी संघटनांसोबत समन्वय बैठक घ्यावी.

टाईम्स स्पेशल

यावेळी उपनेते व सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख संजयराव कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, जि.प. बांधकाम व आरोग्य सभापती अरुण उर्फ आण्णा कदम, पं.स. सभापती डॉ. आफिया पालेकर, संतोष उतेकर यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाखो गणेशभक्तांना उत्सव सुरक्षित आणि शांततेत साजरा करता यावा यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg