loader
Breaking News
Breaking News
Foto

मोदींच्या वाढदिवशी १७ सप्टेंबरला देशाच्या राजकारणात मोठा भूकंप?

कोल्हापूर, : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नरेंद्र मोदींचा वारसदार ठरवला आहे. त्यामुळे अमित शाहांच्या स्वप्नांचा चुरडा झाला असून त्यांचा खेळ संपलायं, भाजपमध्ये बंडाळी माजली असून अमित शाहांचा राजीनामा मागितला जात आहे. त्यामुळे मोदींना मंत्रिमंडळात फेरबदल करायचे असूनही करता येत नाहीत. ४ ज्येष्ठ मंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. १७ सप्टेंबरला मोंदीचा वाढदिवस आहे. त्याचदिवशी देशाच्या राजकारणात भूकंप होवू शकतो, असा धक्कादायक दावा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. शुक्रवारी कोल्हापुरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राऊतांनी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होण्याच्या संदर्भात बोलताना थेट मोदी सरकारमध्ये अंतर्गत कलह सुरु असल्याचा दावा केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार असल्यासंदर्भात सूचक विधान करताना, मराठी माणूस उपपंतप्रधान होणार असेल तर आनंद व्हायला पाहिजे. राष्ट्रीय राजकारणात उलथापालथ व्हायची जास्त शक्यता आहे, तुम्ही पण पहा, असं राऊत यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात बदल करायचा आहे पण ते करू शकत नाहीत कारण त्यांच्या पक्षात आणि त्यांच्या सरकारमध्ये बंडाळी सुरू झाली आहे, असा खळबळजनक दावा राऊतांनी केला आहे. यावेळी पत्रकारांशी पुढे बोलताना खासदार राऊत म्हणाले की, केंद्रातले प्रमुख जुने ४ मंत्री राजीनामा द्यायला तयार नाहीत. ओरिजनल भारतीय जनता पक्षाच्या ४ प्रमुख मंत्र्यांनी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला नाही. आधी अमित शाहा यांचा राजीनामा घ्या अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे अद्याप फेरबदल झालेला नाही, असा दावा राऊत यांनी केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका अशी आहे की, फेरबदलामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात उपपंतप्रधान हे पद निर्माण करा. आरएसएसला मानणार्‍या एका व्यक्तीला त्या ठिकाणी उपपंतप्रधान करा. जो पुढला वारस असेल. अमित शाहा नव्हे. अमित शाहा यांचा खेळ संपलेला आहे, असा दावा राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

टाईम्स स्पेशल

अमित शाहा स्वतःला ’प्राइम मिनिस्टर इन वेटिंग’ समजतात, पण लोक त्यांना तसे मानत नाहीत. संघाच्या गोटातील माहितीनुसार, दिल्लीत सध्या कार्यरत नसलेल्या एका महत्त्वाच्या नेत्याला उपपंतप्रधान करण्याची चर्चा आहे. देशात पंतप्रधानपदाची आणि गृहमंत्रीपदाची जागा रिकामी आहे, त्याचा वारस उपपंतप्रधानपदाच्या माध्यमातून शोधला जाईल, असा दावा यापूर्वीही राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला होता. सप्टेंबर महिना सुरू झालाय. मी १७ सप्टेंबर ही तारीख दिली आहे. या दिवशी मोदींचा वाढदिवस आहे. या क्षणी भाजपात पहिल्यांदाच बंडाळीचं स्वरूप वाढलंय. गेल्या १० वर्षात ते पक्षात नव्हतं. मोदी आणि शाहांची दहशत होती. ती आता राहिली नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करायचे असूनही त्यांना ते करता येत नाहीत. ४ प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. १७ सप्टेंबरला भूकंप होवू शकतो असा दावा खा. संजय राऊत यांनी केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg