loader
Breaking News
Breaking News
Foto

सरसेनापती मल्होजीराजे घोरपडे समाधी जतन-संवर्धनासाठी विशेष बैठकीची मागणी; माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना पत्र

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : संगमेश्वर तालुक्यातील कारभाटले येथील स्वराज्याचे सरसेनापती श्री मल्होजीराजे घोरपडे यांच्या समाधीचे जतन, संवर्धन व विकास करण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या दालनात तातडीने विशेष बैठक आयोजित करण्यात यावी, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार डॉ. विनय श्रीधर नातू यांनी पत्राद्वारे केली आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. आशिष शेलार यांना पत्र पाठवले आहे. छत्रपती संभाजी महाराज स्मारक कसबा (भाग ३) अंतर्गत संगमेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेली स्थळे विकसित करण्याच्या योजनेत कारभाटले येथील समाधी जतन कामाचा समावेश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रु. २००.२ लक्ष (२ कोटी २ लाख रुपये) रक्कमेचे अंदाजपत्रक व आराखडे तयार केले आहेत. तसेच, दुसरीकडे ग्रामपंचायत कारभाटले आणि देवी संस्थान कारभाटले यांनीही घोरपडे वंशजांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र आराखडे तयार केले आहेत. स्वराज्याचे सरसेनापती मल्होजीराजे घोरपडे यांना कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांसोबत मुघलांशी लढताना वीरमरण प्राप्त झाले होते. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या दोन्ही आराखड्यांमध्ये सुसूत्रता येणे अत्यंत आवश्यक आहे.

टाईम्स स्पेशल

या बैठकीला खालील मान्यवरांना व अधिकार्‍यांना निमंत्रित करण्याची मागणी डॉ. नातू यांनी केली आहे. आमदार शेखर निकम (चिपळूण), माजी राज्यमंत्री अजितदादा घोरपडे (सांगली), आमदार मनोजदादा घोरपडे, श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान पुणे व घोरपडे वंशज दोन्ही आराखड्यांशी संबंधित शासकीय अधिकारी या सर्व घटकांची संयुक्त बैठक झाल्यास दोन्ही आराखडे व मागण्या एकत्र करून ’श्री छत्रपती संभाजी महाराज स्मारक कसबा (भाग ३)’ चे आराखडे अधिक प्रभावीपणे बनवले जातील. यामुळे ग्रामपंचायत कारभाटले आणि घोरपडे वंशज यांच्या रास्त मागण्यांचाही यात समावेश होईल, असा विश्वास डॉ. विनय नातू यांनी पत्रात व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg