loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत घरफोडी! मुगीज कलमपेठ येथे बंद घर फोडून ८ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

खेड (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील मुगीज कलमपेठ गावात धक्कादायक घरफोडीची घटना घडली आहे. बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील तब्बल ८ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या घटनेने संपूर्ण दापोली तालुक्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुगीज कलमपेठ येथील एक कुटुंब घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास घरात प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉकर तोडून त्यातील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याच्या चैन्स, सोन्याचे हार आणि इतर दागिने असा एकूण ८ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सकाळी शेजाऱ्यांना घराचा दरवाजा तुटलेला दिसल्याने त्यांनी घरमालकाला कळवले. घरमालक घरी परत आल्यावर त्यांना सर्व प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दापोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. चोरट्यांनी अतिशय शिताफीने ही चोरी केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

टाईम्स स्पेशल

गेल्या आठवडाभरात खेड, मंडणगड आणि दापोली तालुक्यात घरफोडीच्या ३ ते ४ घटना घडल्या आहेत. गणेशोत्सव जवळ आल्याने अनेक घरे बंद राहतात, त्यामुळे चोरटे अशा बंद घरांना लक्ष्य करत आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे आणि पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg