वैभववाडी(प्रतिनिधी)- वैभववाडी तालुक्यात सांस्कृतिक चळवळ वृद्धिंगत व्हावी म्हणून अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंचची गेल्या वर्षीच स्थापना करण्यात आली. या चळवळीतर्फे आता वैभववाडीचे सुपुत्र कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त श्रावणसरी हा कविसंमेलनाचा कार्यक्रम ६ सप्टेंबर रोजी स.१० वा. आयोजित करण्यात आला आहे.बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन, वैभववाडी येथे होणार्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री प्रमिता तांबे यांची निवड करण्यात आली आहे.
या काव्यसंमेलनाचे उद्धघाटन आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडीचे प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वैभववाडीचे पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. कविवर्य नारायण सुर्वे हे सिंधुदुर्ग सुपुत्र. वैभववाडी हेत हे त्यांचे गाव असून त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांचे स्मरण करण्यासाठी सदर कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलनात सहभागी कवी-कवयित्रींना आपल्या आवडीची एक स्वरचित कविता सादर करता येणार आहे. तसेच काव्यसंमेलनाचे स्वरूप खुले ठेवण्यात आले असून, नोंदणी करणार्या पहिल्या ३० कवींना कविता सादरीकरणाची संधी मिळणार असून सहभागी सर्व कवींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी काव्य, साहित्य आणि संस्कृतीच्या माध्यमातून तालुक्यातील साहित्यिकांना एकत्र आणणार्या या उपक्रमात जास्तीत जास्त कवी-कवयित्री व साहित्यप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंचचे अध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील, सचिव चेतन बोडेकर यांनी केले आहे.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.