loader
Breaking News
Breaking News
Foto

कोमसाप दापोली आयोजित श्रावणधारांमध्ये काव्यरसिक ओलेचिंब

दापोली (प्रतिनिधी) : माणसाला जन्मापासून मृत्यूपर्यंत साथ देते तीच खरी कविता" असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी सुदेश मालवणकर यांनी ए.जी. हायस्कूल येथील आयोजीत श्रावणधारा या कवीसंमेलनात अध्यक्ष म्हणून बोलताना व्यक्त केले.त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कविता म्हणजे काय हे समजावून सांगतानाच मराठी कवितेतील दहाहून अधिक प्रकार सोदाहरण सादर केले. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा दापोली आयोजित 'श्रावणधारा' कवीसंमेलन ए.जी. हायस्कूल येथील माधवराव कोकणे सभागृहात पार पडले. कोमसाप दापोली आणि ए.जी. हायस्कूल दापोली आयोजित या कार्यक्रमात निमंत्रित कवी तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कवीसंमेलनात रसिक अक्षरक्षः ओलेचिंब होऊन कवीसंमेलनात सहभागी सर्व कवींच्या काव्यवाचनाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा दापोलीचे अध्यक्ष चेतन राणे यांच्या अध्यक्षतेखालील या कवीसंमेलनासाठीच्या व्यासपीठावर कोमसाप दापोलीचे सचिव बाबू घाडीगांवकर, सहसचिव अरविंद मांडवकर, उपाध्यक्ष प्रा. कुणाल मंडलीक, सुनील कदम, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघटनेचे सदस्य रवींद्र कालेकर, ए.जी. हायस्कूलचे मुख्याध्यापक शरद कांबळे, उपमुख्याध्यापक एस.आय.मगदूम, पर्यवेक्षिका सोनाली मेहंदळे, ज्येष्ठ शिक्षिका मानसी अभ्यंकर, प्रा. कैलास गांधी, गझलकार सुदेश मालवणकर, कोमसापच्या माजी अध्यक्षा व कवयित्री रेखा जेगरकल, कवी जयवंत चव्हाण, युवाशक्ती विभाग प्रमुख तेजस मेहता, राजेश पवार, श्रेया भावे आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन तसेच शारदा पुजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. कोमसाप दापोलीचे सचिव बाबू घाडीगांवकर यांनी 'श्रावणधारा' कवीसंमेलनाचे प्रास्ताविक केले. कवीसंमेलनात निमंत्रित कवी असलेल्या प्रा. कैलास गांधी, सुनील कदम, जयवंत चव्हाण यांनी स्वरचित काव्यरचनांचे अप्रतिम सादरीकरण करुन रसिकांची वाहवा मिळवली. या कवीसंमेलनात ए.जी. हायस्कूल दापोली येथील ज्यूनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या गटातील २१ विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वरचित काव्यरचना सादर केल्या. या स्पर्धेत पुढीलप्रमाणे विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले- नमस्या अभिजित पतंगे- प्रथम, मैथिली मंदार कार्लेकर- द्वितिय, आर्या मंगेश गावडे- तृतिय, सौम्या विजय आंजर्लेकर- उत्तेजनार्थ, सिया सिताराम जागडे- उत्तेजनार्थ. या यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम, भेटवस्तू व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय सर्व कवींना देखील भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. काव्यवाचन स्पर्धेसाठी रेखा जेगरकल व सुदेश मालवणकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून इयत्ता सहावीच्या कलाशिक्षण पाठ्यपुस्तकाच्या विषय समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या ए.जी. हायस्कूलचे शिक्षक श्रीराम महाजन यांचा कोमसापच्या वतीने सत्कार करण्यात आला. 'काव्यलेखन-तंत्र आणि मंत्र' या विषयावर परिक्षक सुदेश मालवणकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संपूर्ण कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. कुणाल मंडलीक यांनी आपल्या शब्दांच्या कलात्मक गुंफणीने करून कवी संमेलनाची मैफल अधिकच रंगतदार केली. तर श्रेया भावे यांनी सर्वांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg