loader
Breaking News
Breaking News
Foto

‘निशांत तोरसकर’ यांच्यावर शिवसेनेची नवी जबाबदारी!

सावंतवाडी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी नियुक्त्यांमध्ये निशांत तोरसकर यांच्यावर तालुका संघटक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नगरपालिका निवडणुकीत पॅनेलसाठी उभ्या करण्यात आलेल्या २० उमेदवारांचे नियोजन व विविध कामांची जबाबदारी तोरसकर यांनी आपल्या कार्यालयामार्फत यशस्वीपणे सांभाळली होती. पक्ष संघटनेसाठी केलेल्या कार्याची दखल व त्याची पोचपावती म्हणून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मिळालेली जबाबदारी प्रामाणिकपणे व निष्ठेने सांभाळत संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे तोरसकर यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक तसेच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ यांनी आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल तोरसकर यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg