loader
Breaking News
Breaking News
Foto

कोनाळ वनपरिमंडळ कार्यालयात राष्ट्रीय वन हुतात्मा दिन

तिलारी (प्रतिनिधी), - वन व वन्यजीवांचे संरक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या वन अधिकारी व कर्मचार्‍यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रीय वन हुतात्मा दिन कोनाळ वनपरिमंडळ कार्यालयात श्रद्धापूर्वक साजरा करण्यात आला. यावेळी वन हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करून त्यांच्या त्याग, धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेचे स्मरण करण्यात आले. सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे तसेच वनक्षेत्रपाल दोडामार्ग संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी वनपरिमंडळ अधिकारी कोनाळ चंद्रकांत पावसकर, वनपरिमंडळ अधिकारी मनेरी तुकाराम हाक्के, वनरक्षक बांबर्डे शुभम वारके, वनरक्षक हेवाळे अनिल राख, वनरक्षक कोनाळ सुशांत कांबळे, वनरक्षक पाट्ये सूर्यभान गीते तसेच तपासणी नाका कोनाळ येथील वनरक्षक श्रीमंत कदम उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी वन हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या अतुलनीय त्यागाचे स्मरण करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg