loader
Breaking News
Breaking News
Foto

गवळीवाडा उतारावर रिक्षाटेम्पोचा अपघात; भीषण अपघातात तिघे गंभीर, रुग्णालयात उपचार सुरू

रत्नागिरी (जमीर खलफे) : शहरातील गजबजलेल्या धनजीनाका परिसरात गवळीवाडा येथील तीव्र उतारावर एका रिक्षाटेम्पोचा भीषण अपघात झाला. उतारावरून खाली येत असताना ब्रेक निकामी झाल्याने हा टेम्पो रस्त्यावरच पलटी झाला. या दुर्घटनेत चालकासह टेम्पोतील अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गवळीवाड्याकडील तीव्र उतारावरून धनजीनाक्याच्या दिशेने येत असताना अचानक वाहनाचे ब्रेक निकामी झाले. वेगाने खाली जाणाऱ्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

धनजीनाका हा रत्नागिरीतील मुख्य बाजारपेठेचा प्रवेशद्वार मानला जातो. त्यामुळे या परिसरात पादचाऱ्यांची मोठी वर्दळ तसेच दुतर्फा अनेक लहान-मोठ्या वाहनांची गर्दी असते. ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच चालकाने इतर वाहने आणि नागरिकांना वाचवण्यासाठी प्रसंगावधान दाखवत नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा टेम्पो इतर कोणालाही न धडकता उलटला आणि गर्दीच्या ठिकाणी होणारा मोठा अनर्थ टळला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना वाहनातून बाहेर काढले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg