loader
Breaking News
Breaking News
Foto

विज्ञान नाट्‌योत्सव स्पर्धेत पेडणेकर विद्यालय तळवडेची ‘स्ट्रिया - द लास्ट होप’ नाटिका प्रथम

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - पंचायत समिती शिक्षण विभाग लांजा, लांजा तालुका विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तळवडे येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान नाट्‌योत्सव स्पर्धेत जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडेने सादर केलेल्या ‘स्ट्रिया द लास्ट होप’ या नाटिकेने प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘स्ट्रिया - द लास्ट होप’ या नाटिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. यामध्ये तेजस सावंत, श्रेयस चव्हाण, हिमांशू पाटोळे, ज्ञानेश्वरी शिंदे, आराध्या भिंगारे, श्रवण कांबळे, मेघना पोवार यांनी उत्तम अभिनय केला. नाटिकेचे लेखन भूषण बागुल, दिग्दर्शन गणेश झोरे, विवेक किल्लेदार, विनायक घगवे यांनी केले. ध्वनी संयोजन व लाईट संदेश हतपले, योगेश पितळे, नयन पितळे, शुभम भितळे, आकाश भितळे, नयन सांडिम यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg