loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर पंचायत समितीच्या वतीने रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन

वरवेली (गणेश किर्वे) - महिलांना स्वावलंबनासाठी बचत गटाला मदत करणे आमचे काम आहे भविष्यात पंचायत समिती शेजारील शाळेच्या जागेत बचत गट भवन उभारणार असल्याचे पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर यांनी सांगितले. उमेद अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत गुहागर पंचायत समितीच्या वतीने रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.तालुक्याचे ठिकाण व पर्यटन यामधून वाढती बाजारपेठ लक्षात घेऊन बचत गटांच्या विविध वस्तू विक्रीसाठी बचत गट भवन प्रस्तावित आहे उपसभापती निलेश सुर्वे यांनी सांगितले की, जुन्या काळी लहान भाजा खाणे ही पोटाची गरज होती, आता रासायनिकयुक्त पदार्थांच्या दुनियेत नैसर्गिक रानभाजी खाणे ही जगाची व काळाची गरज बनली आहे. फणस ,काजू व रानभाज्यांसारखे हंगामी पदार्थ फ्रोजन पद्धतीने तयार करून वर्षभर विक्री होऊ शकते यामधून मोठी रोजगार संधी आहे रानभाज्यांपासून बनवलेल्या विविध पदार्थ करण्याची पद्धत सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी पुस्तक केले पाहिजे अशी सूचना केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बचत गटांच्या माध्यमातून रानभाज्यांपासून केलेल्या विविध पदार्थांचे स्पर्धा घेण्यात आली यामध्ये प्रथम ऋतुजा डिंगणकर वरवेली (भारंगीच्या भाजीपासून करंजी), द्वितीय अक्षता गुजर देवघर (भाजीचे कटलेट), तृतीय विभागून सुचित्रा भोसले आरे व संयुक्ता मोरे नरवण (टाकळ्याच्या भाजीचे मोदक) उत्तेजनार्थ सुप्रिया देसाई वरवेली (वरीचा केक) यांची निवड करण्यात आली. यावेळी नाचणीची इडली, ज्वारीच्या भाकरीचा पिझ्झा, भारंगीच्या भाजीची भाकरवडी टाकळ्याच्या भाजीचे लाडू व मोदक शेवग्याच्या शेंगाच्या वड्या आदी पदार्थांना विशेष पसंती मिळाली. यावेळी पंचायत समिती सदस्य संदीप गोरीवले सारिका दाभोळकर व उमेदचे जिल्हा व्यवस्थापक सचिन पाटणकर यांनी मार्गदर्शन केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg