loader
Breaking News
Breaking News
Foto

माखजन पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत गणेशोत्सव शांततेत आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन: सरंद येथे २२ गावांच्या पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यात आगामी गणेशोत्सव सण सर्वत्र उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा होत असताना, हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच हा सण शांततेत आणि पारंपारिक पद्धतीने पार पडावा, या उद्देशाने आज माखजण पोलीस दूरक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या सरंद येथील साठे मंगल कार्यालयात एक विशेष शांतता समिती व मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मितिश किनी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला संगमेश्वर तालुक्यातील माखजन पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीतील तब्बल २२ गावांमधील पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, गावातील प्रमुख मानकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य सुशील भायजे, पंचायत समिती सदस्य बावा जड्यार यांच्यासह माखजन पोलीस दूरक्षेत्रांतर्गत येणाऱ्या विविध गावांचे सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ​बैठकीदरम्यान बोलताना संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मितिश किनी यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. गणेशोत्सव हा संगमेश्वर तालुक्यासह संपूर्ण कोकणातील अत्यंत पवित्र आणि आपुलकीचा सण असल्याने या काळात हद्दीतील कायदा व सुव्यवस्था राखणे ही आपली सर्वांची सामायिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच शासकीय नियमांचे आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन करून हा सण अत्यंत निर्भय, सुरक्षित आणि पारंपारिक पद्धतीने आनंदाने साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले. यासोबतच सायबर गुन्हेगारीबाबत सतर्क करताना त्यांनी स्पष्ट केले की, सणासुदीच्या काळात सोशल मीडियाचा वापर वाढतो; त्यामुळे नागरिकांनी धार्मिक भावना दुखावणारे संदेश किंवा अफवा पसरवू नयेत, तसेच कोणत्याही अज्ञात आर्थिक प्रलोभनांना बळी न पडता आपली गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नये.

टाईम्स स्पेशल

​यानंतर माखजन पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी यांनीही उत्सव आणि सायबर सुरक्षेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. माखजन पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीतील या भागात उत्सवाचा आनंद लुटतानाच परिसरातील शांतता आणि सुव्यवस्था टिकून राहील याची दक्षता प्रत्येक ग्रामस्थाने आणि गणेशोत्सव मंडळाने घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. मिरवणुकीचे नियम, ध्वनीप्रदूषण आणि इतर प्रशासकीय नियमांचे पालन करून सर्वांनी एकोप्याने आणि पारंपारिक रीतीने सण साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच वाढत्या सायबर गुन्हेगारीवर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाइन फसवणूक, फेक लिंक्स आणि ओटीपी फ्रॉड यांसारख्या प्रकारांपासून नागरिकांनी अत्यंत सावध राहिले पाहिजे. कोणत्याही संशयास्पद मेसेज किंवा कॉल्स आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असा मोलाचा सल्ला त्यांनी या वेळी दिला. ​बैठकीच्या शेवटी उपस्थितांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आश्वासन दिले. संगमेश्वर तालुक्यातील व माखजन दूरक्षेत्रांतर्गत येणाऱ्या २२ गावांचे उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, गावकरी आणि पोलीस पाटलांनी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून गणेशोत्सव अत्यंत शांततेत, सुरक्षित आणि उत्साही वातावरणात पार पाडण्याचा दृढ निर्धार व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg