loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळ्यात 'गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान'चा सार्वजनिक दहीहंडी उत्सव धुमधडाक्यात

म्हसळा (रायगड): गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान, म्हसळा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सार्वजनिक दहीहंडी उत्सव २०२६ अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाचे हे १५वे वर्ष (अमृत महोत्सवी टप्पा) असल्याने संपूर्ण म्हसळा शहरात आनंदाचे वातावरण होते. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी या सोहळ्यास विशेष उपस्थिती लावून गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला आणि शुभेच्छा दिल्या. या दहीहंडी उत्सवात एकूण ७ नामांकित गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये शिस्तबद्धता आणि वेगाचे प्रदर्शन करत संत शिरोमणी श्री गोरोबाकाका कुंभार समाज पथकाने अवघ्या ३४.७३ सेकंदात ५ थर यशस्वीरीत्या रचून मानाची दहीहंडी फोडण्याचा बहुमान पटकावला. विजेत्या पथकाला रोख रक्कम रु. ११,०००/-, सन्मानचिन्ह आणि मानाची भीमगदा देऊन गौरवण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच श्री गणेश पेठ गोविंदा पथकाने १ मिनिट ४७ सेकंदात ५ थर रचून दहीहंडीला सलामी दिली. श्री पेठकर समाजाने १. ४९ सेंकदाने ४ थर रचत दहीहंडी फोडली. या सोहळ्यात महिलांच्या सहभागाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले, महिला मंडळाने कौशल्याने ३ थर रचत दहीहंडी फोडून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यात प्रमुख पाहुण्या मंत्री अदितीताई तटकरे यांच्यासह हिंदू संघटना म्हसळा तालुका माजी अध्यक्ष महादेव पाटील, ज्येष्ठ पत्रकार संजय खांबेटे, पत्रकार उदयजी कळस,'दैनिक सूर्योदय'चे उपसंपादक संतोष उद्धारकर, शिवसेना माजी तालुकाप्रमुख प्रसाद बोर्ले, गोरक्षक प्रवीण (बाबू) बनकर, पोलीस उपअधीक्षक योगिता कुठे मॅडम, पोलीस अधीक्षक राजेंद्र जाधव, श्रीराम नवरात्र मंडळाचे अध्यक्ष गणेश हेगीष्टे, हिंदू ग्रामस्थ मंडळाचे सचिव सुशील यादव, म्हसळा नगरपंचायतचे नगराध्यक्ष सुनील शेडगे, माजी नगराध्यक्ष संजय कर्णिक, पंचायत समितीचे सभापती बबन मनवे, गणेशपेठ गोविंदा पथकाचे भालचंद्र करडे, उमरोठकर गुरुजी, महेंद्र करडे, प्रसाद पोतदार, कुंभार समाज पथकाचे अध्यक्ष गोविलकर, संतोष कुडेकर, सुरेश कुडेकर, भाई बोरकर, अभय कळमकर, माजी मुख्याध्यापिका दातार बाई आणि व्यापारी गोविंदा पथकाचे ललित जैन यांचा पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची राजमुद्रा देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

हा सोहळा निर्विघ्न आणि अभूतपूर्व यशस्वी करण्यासाठी गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन कमळाकर करडे, युवासेनेचे श्री कौस्तुभ करडे, गोरक्षक प्रसन्न निजामपूरकर, श्लोक करडे, निहार बनकर, राजेश करडे, युवराज करडे, श्रीयन करडे, समिर करडे, मयुरेश करडे, संतोष कुडेकर, शैलेश करडे, स्वानंद बोरकर, श्रेयश दातार, आयुष्य करडे, श्रेया करडे, पूर्वा जोशी, महेंद्र जोशी, राहुल पोतदार यांच्यासह प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg