loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ कृपा स्कूलच्या भक्ती घडशी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

खेड - डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या मार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. यावर्षी श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज (सी.बी.एस.ई.) वेरळ येथील भक्ती काशिनाथ घडशी या २०२६च्या या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी शिक्षकांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्रशालेचे प्राचार्य डॉ. एस. एस. अली, सीईओ डॉ. विजय रॉबर्ट, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg