loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये काँग्रेसचा दहीहंडी उत्सव जल्लोषात; १ लाख ११ हजार, ई-बाईक, फ्रिजसह लाखोंची बक्षिसे - महिलांसाठी विशेष हंडी

खेड : खेड तालुका काँग्रेसच्या वतीने यंदा खेड शहरात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात आणि दिमाखात आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवात केवळ गोविंदा पथकांची सलामीच नव्हे तर होम मिनिस्टर, सांस्कृतिक कार्यक्रमांसह मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. या वर्षीच्या दहीहंडी उत्सवासाठी आयोजकांनी बक्षिसांचा वर्षाव केला आहे. प्रथम बक्षीस - रु. १,११,१११/- तसेच ई-बाईक, वॉशिंग मशीन, फ्रीज यांसह अनेक आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिलांसाठी स्वतंत्र आणि विशेष हंडीचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे महिला गोविंदा पथकांनाही आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजीमभाई सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली खेड तालुका काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत. खेड शहरात काँग्रेसच्या या भव्य दहीहंडी उत्सवाची जोरदार चर्चा असून गोविंदा पथकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg