खेड : भारतीय जनता पार्टी व राजवैभव प्रतिष्ठान, खेड आयोजित "नमो दहीहंडी उत्सव - २०२६" मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा हा पारंपरिक दहीहंडी उत्सव यंदाही छत्रपती शिवाजी महाराज चौक, खेड येथे भव्यतेत पार पडला. भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा. नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या माध्यमातून गेली २० वर्षे हा उत्सव अविरतपणे साजरा केला जातो. यंदाही तरुणाईचा जोश आणि नागरिकांचे पाठबळ लाभले. लेझर लाईट, भव्य व्यासपीठ, बालगोपालांचा उत्साह, गोविंदांचा थरार आणि जनसमुदायाचा उस्फूर्त प्रतिसाद यामुळे संपूर्ण वातावरण "गोविंदा आला रे आला" या जयघोषाने दुमदुमून गेले.
दापोली, हर्णे, चिपळूण, खेड येथील अनेक गोविंदा पथकांनी या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या नमो दहीहंडी उत्सवात खेड तालुक्यातील ५ गोविंदा पथकांनी कडक ८ थर रचून थरार दाखवला. हिंदूराज गोविंदा पथक, खेड, हिंदूराज गोविंदा पथक, दापोली, खेमनाथ गोविंदा पथक, सुसेरी-खारी, खेड, एकविरा गोविंदा पथक-कुंभारवाडा, खेड, आई खोंडेकरिन गोविंदा पथक- खोंडे, खेड या सर्व पथकांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व मानाची गदा देऊन गौरविण्यात आले. यावेळी ॲड. वैभव खेडेकर यांनी सर्व गोविंदा पथकांचे भरभरून कौतुक करत शुभेच्छा दिल्या. दहीकाला उत्सव हा केवळ परंपरेचा नव्हे तर सामाजिक एकतेचा, तरुणाईच्या सामर्थ्याचा आणि संस्कृतीच्या अभिमानाचा सोहळा असल्याचे त्यांनी सांगितले.
या उत्सव प्रसंगी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, उपाध्यक्ष संजय आखाडे, ज्येष्ठ नेते राजू रेडीज, खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष रहीम सहिबोल, नगरसेविका वैभवी खेडेकर, युवा मोर्चा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, नईम चौगुले, निलेश बामणे, माजी नगराध्यक्षा उर्मिला शेट्ये-पाटणे, आशा सनगरे, प्रीती चिखले, मिनल गुहागरकर, राहुल पाटणे, राजन खेडेकर, शुभम गायकवाड, अनिकेत पवार, अंकुश मिर्लेकर, सर्वेश पवार यांच्यासह भाजपा, युवा मोर्चा व महिला मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.