loader
Breaking News
Breaking News
Foto

तेरेवायंगणीत वानरांचा त्रास वाढलाय; प्रशासन गंभीर नाही त्यामुळे शेतकर्‍यांच्या पिकाचे मोठे नुकसान

दापोली (प्रतिनिधी) : तेरेवायंगणी परिसरात वानरांचा प्रचंड त्रास वाढला आहे. शेतातील पिके, फळबागा आणि भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दिवस-रात्र कष्ट करून उभे केलेले पीक काही मिनिटांत उद्ध्वस्त होताना पाहावे लागते आहे. मात्र प्रशासन गंभीर नसल्याने यावर काहीही उपाय योजना करताना दिसत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. दापोली तालुक्यातील तेरेवायंगणी येथील लोकांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन हे शेती आहे. खरीप हंगामात येथील रहिवासी शेतकरी आपल्या दारावाटल्या परिसरातील जमिनीवर भात, नागली, काकडी, पडवळ, चिबुड, भोपळा, चवळी, झेंडू आदी विविध भातशेतीचे वाण भाजीपाला फळ, फुलं, कंदमुळं याची सर्रास लागवड करतात. या केलेल्या लागवडीतून उत्पादन सुरू झाले रे झाले की रात्रीच्या वेळेस रानडुक्कर, साळिंदर तर दिवसा वानर, केलडी यांचा मोठा त्रास होतो. याबाबत अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या, अर्ज दिले, पाठपुरावा केला. मात्र अजूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नुकसानभरपाई मिळाली नाही तरी चालेल, पण या समस्येवर कायमस्वरूपी उपाय होणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचा संयम आता संपत चालला आहे. रोजचे नुकसान, वाढता खर्च आणि त्यात वानरांचा उपद्रव यामुळे शेती करणे कठीण होत आहे. प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कार्यवाही करावी आणि वानरांना पकडून योग्य ठिकाणी स्थलांतरित करावे, एवढीच अपेक्षा आहे. हा प्रश्न फक्त कोणा एकाचाच नाही, तर अनेक शेतकरी आणि गावकर्‍यांचा आहे. संबंधित अधिकार्‍यांनी याची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करावी. तेरेवायंगणी ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच डी एल. कोळंबे यांनी आपल्या अर्धागींनी दर्शना कोळंबे यांच्या मदतीने आपल्या घराजवळील जमिनीत चिबुड लागवड केली होती.

टाईम्स स्पेशल

चिबुड फळ तयार होण्याआधीच वानरांची टोळी चिबडांना चावा घेऊन नासाडी करत असल्याने कोळंबे दांपत्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे चिबुड लागवडीसाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि उपसलेल्या कष्टाचे त्यांना फळ मिळण्याऐवजी अशा या प्रकारामुळे त्यांची मेहनत वाया गेली आहे. अशाचप्रकारे तेरेवायंगणीत ज्यांनी ज्यांनी काही ना काही आपल्याला घराच्या परिसरात खरीप हंगामात लागवड केली आहे. त्यांना त्यांना वानराच्या उपद्रवाचा त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे वन विभागाने याची खास दखल घेऊन वानरांना पकडून अन्यत्र सुरक्षित स्थळी हलविण्याचीे मागणी स्थानिकांतून होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg