loader
Breaking News
Breaking News
Foto

शाळेला भव्य प्रवेशद्वाराची कमान भेट; माजी सरपंच हुसैनभाई ठाकूर यांचा स्तुत्य उपक्रम

खेड (प्रतिनिधी) : जि. प. पू. प्रा. शाळा, बोरघर घोलपवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी या शाळेला अजगणी गावचे माजी सरपंच हुसैनभाई ठाकूर यांनी भव्य व आकर्षक प्रवेशद्वाराची कमान बांधून देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. हुसैनभाई ठाकूर हे वाढदिवसाच्या निमित्ताने सहज शाळेत आले असता शाळेच्या वतीने त्यांच्यासमोर शाळेच्या प्रवेशद्वारासाठी कमान उभारण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी स्वतःहून ही जबाबदारी स्वीकारत कमान बांधून देण्याचा शब्द दिला. दिलेला शब्द पूर्ण करत त्यांनी शाळेला सुंदर व आकर्षक अशी कमान भेट दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांच्या या उपक्रमामुळे शाळेच्या प्रवेशद्वाराच्या सौंदर्यात भर पडली असून विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक कार्यातून शाळेच्या विकासाला हातभार लावणाऱ्या हुसैनभाई ठाकूर यांच्या या योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्याबद्दल शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयराम चव्हाण, उपाध्यक्षा वेदिका गोवळकर व सर्व सदस्य, तसेच मुख्याध्यापक प्रांजली करजवकर तसेच सहशिक्षिका शितल वाघ, मोहन मानेटवर यांनी हुसैनभाई ठाकूर यांचे मनःपूर्वक आभार मानत लाख लाख शुभेच्छा दिल्या. शाळेच्या विकासासाठी अशा प्रकारे समाजातील दानशूर व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींचे सहकार्य मिळणे ही निश्चितच शाळेसाठी अभिमानाची बाब आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg