loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूल खेडमध्ये बाळगोपाळांनी केली दहीहंडी साजरी

खेड (प्रतिनिधी) - रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमधील बाळगोपाळांनी शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर 2026 रोजी गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडीचा सण उत्साहात साजरा केला. सदरच्या कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी बाळकृष्णाच्या मूर्तीचे पूजन केले. त्यानंतर चिमुकल्यांनी ’गोविंदा आला रे आला’ अशा गाण्यांच्या तालावर दहीहंडी साजरी केली. दहीहंडी म्हटली की, आठवण होते ती भगवान श्रीकृष्ण व त्यांच्या सवंगड्यांची. शिक्षणाबरोबरच भारतीय परंपरा व संस्कृती जोपासणाऱ्या रोटरी शाळेतील बालवाटिका विभागातील लहानग्यांनी श्रीकृष्ण, राधा, पेंद्या, सुदामा, गोविंदा अशा अनेक वेशभूषा करत दहीहंडीचा मनमुराद आनंद लुटला. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे प्रशालेमध्ये गोकूळ अवतरल्याचा भास निर्माण झाला होता. यावेळी खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी उच्चमाध्यमिक विभागप्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख शैलेश देवळेकर, पूर्वमाध्यमिक विभागप्रमुख देवयानी महाजन, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख प्रितम वडके, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. रोटरी स्कूलचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg